Wednesday, 29 April 2020
बाबा...
Thursday, 2 April 2020
वेळ मिळालाय….
वेळ मिळालाय….
वेळ मिळालाय पुन्हा rewind व्हायला,
राहिलेलं, चुकलेले शोधायला,
निसटलेलं, लपलेलं बघायला,
मनात असलेलं सारं करायला,
वेळ मिळालाय पुन्हा rewind व्हायला…
तुटलेली, बोचलेली, हरवलेली पण हवीहवीशी वाटणारी माझी माणसं शोधायला,
समज, गैरसमज मागे सारून पुन्हा नव्याने जगायला,
कधी मनातलं, न बोललेलं मनसोक्त बोलायला,
वेळ मिळालाय पुन्हा माझी नाती revive करायला….
लहानपणीची स्वप्न, आवडी-निवडी जपायला,
आपल्यातील कलाकार शोधायला,
मोठं झाल्यावर काय काय करायचे होते मला??
ती यादी हुडकायला,
Success आणि status च्या गर्दीत हरवलेलं
ते स्वप्नाळू मुलं शोधायला,
वेळ मिळालाय पुन्हा ती स्वप्न rewind करून पहायला…
लहानपणी शिकलेली स्तोत्र, पाढे, परवचा पुन्हा म्हणायला,
आई-आजी ने शिकवलेलं सारं करून पहायला,
सूर्य-नमस्कार, योगासने, जोर-बैठका काढायला,
वेळ मिळालाय पुन्हा rewind होऊन बालपण जगायला…
मिळालेल्या Rewind बटणाचा योग्य वापर करायला,
देवा आता तरी शिकव आम्हाला चांगले वाईट पहायला,
प्रेमाच्या माणसांवर प्रेम करायला,त्यांना जपायला,
एकदाच मिळणारे हे आयुष्य नव्याने सुरू करायला,
वेळ मिळालाय पुन्हा rewind व्हायला…
- गौरी भिडे-दातार.
बाबा...
किती वर्षे, जगलात… ह्याहून अधिक महत्त्वाचे असते ते ती वर्षे, किती समृद्धपणे आयुष्य जगलात. बाबा मला नक्कीच कमी मिळाले पण ती वर्ष...