किती वर्षे, जगलात… ह्याहून अधिक महत्त्वाचे असते ते ती वर्षे, किती समृद्धपणे आयुष्य जगलात.
बाबा मला नक्कीच कमी मिळाले पण ती वर्षे माझ्यासाठी अनमोल आणि समृद्ध होती.
त्या सहवासात त्यांनी आम्हाला जे शिकवलं, जे संस्कार केले, ते आज समर्थपणे पुढच्या पिढी पर्यंत पोचत आहेत.
एखादी व्यक्ती जेव्हा आपल्यातून जाते ना तेव्हा त्यांना शेवटचे पाहणे इतके क्लेशदायक नसते जेवढे त्यांच्या शिवाय जगणे. रोज ती पोकळी भरून काढण्याचा प्रयन्त करणे. मग हळूहळू आपल्या हे लक्षात येते की आपण फक्त त्या व्यक्तीला पाहू शकत नाही पण त्यांचे अस्तित्व असते अगदी आपल्या आसपास.
बाबा फक्त आमच्याच मनात नाहीत तर ज्यांना ज्यांना बाबांच्या सहवासाचा परिस स्पर्श झाला आहे अश्या सर्वांच्या मनात ते आजही आहेत, असंख्य आठवणी आणि अनुभवांच्या रूपात, त्यांचं व्यक्तिमत्त्व होतचं तसं.
लोक म्हणतात गेलेली माणसं विस्मृतीत जातात पण बाबा आजही आहेत.त्यांच्यावर प्रेम करणारे मित्र,सहकारी, नातेवाईक, शेजारी अगदी त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाने त्यांना जतन करून ठेवलंय स्मृती रूपाने.
ह्या स्मृतींनी, त्यांच्या आठवणींनी बाबांना अशाही सर्वांशी जोडलंय ज्यांनी कधी न त्यांना पाहिले ना भेटले.
माझ्या बाबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आज त्यांच्या स्मृतिदिना दिवशी माझे वंदन.
गौरी भिडे-दातार
२९ एप्रिल २०२०
No comments:
Post a Comment